Saturday, May 4, 2024
Homeजळगावऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरात शोककळा

ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा परिसरात शोककळा

आमोदा Amoda ता. यावल

ऐन दिवाळीच्या (day of Diwali) दिवसात आमोदा येथे तीन कुटूंबांतील (three families) सदस्यांवर (members) काळाने झडप घालत (Time is running out) तीन जीवांना (Losing three lives) हिरावून नेले आहे. यामुळे आमोदा गावावर शोककळा (Mourning in the village) पसरली आहे.

- Advertisement -

आमोदा येथील रहिवाशी पूजा पाटील, अरुणा तायडे, धीरज चौधरी असे तीन जीवांचे गेल्या पंधरा दिवसात अकस्मात निधन झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा गावावर शोककळा पसरली आहे.
    पूजा निलेश पाटील या किडनीच्या आजाराने चार महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचे पती निलेश पाटील हे नाशिक येथील कंपनीमध्ये नोकरीस होते. निलेश चे वडील सुरेश पाटील हे शेतकरी होते. घरी जेमतेम शेती असल्याने निलेश यास उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे नोकरीस पाठवले. त्याचे लग्न लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पूजाशी लावण्यात आले. पूजाचे आई-वडील हे आधीच मृत्यू पावलेले असून तिला भाऊ व चार बहिणी होत्या. चांगले सासर म्हणून निलेश याच्याशी भावांनी पूजाचे लग्न लावून दिले होते.
     त्यानंतर मुलगा कार्तिक वय चार वर्ष, मुलगी चित्रांशी नऊ महिने अशी दोन अपत्य झाली. पूजा हिची किडनी फेल झाल्याने निलेश याने नाशिक येथील सुयश हॉस्पिटल, गुरुजी रुग्णालय येथील ट्रीटमेंट घेऊन सोलापूर येथे सुद्धा दवाखान्यात उपचार केले. नंतर जळगाव येथील गोदावरी व ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. पण अखेरीस तिचा मृत्यू झाला.
     निलेश याला जेमतेम पगार असल्याने सर्व खर्च न परवडणारा होता. त्यांनी पत्नीला वाचवण्यासाठी नातेवाईकांकडून खर्चासाठी पैसे जमा केले तसेच पत्नी आजारी असल्याने चार महिने पत्नी बरोबर राहिल्याने नोकरी सुद्धा गेली. आता लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली.
       दुसऱ्या घटनेत ३० तारखेला धीरज चौधरी याचा सुद्धा एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला. त्याची आई लहानपणीच वारल्याने वडील शशिकांत चौधरी यांनी मोलमजुरी करून त्याचे आयटीआय पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांचा सुद्धा म्हातारपणाचा आधार गेला.
   अरुणा पंकज तायडे ही तरुणी देखील पंधरा दिवसापासून  मृत्यूशी झुंज देत होती. तिचा पती पंकज  हा छोटेसे किराणा दुकान  चालवत होता. तर पत्नी अरुणा आरोग्य केंद्रामध्ये गटप्रवर्तक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना सुद्धा मुलगा व मुलगी हे प्राथमिक शिक्षण घेत असून त्यांचा उदरनिर्वाह हा दोन्ही जण चालवत होते. पंकजची आई सुद्धा आजारी असून तिची ट्रीटमेंट डॉक्टरांकडून चालू आहे. परंतु अरुणाचा एक्सीडेंट झाला. मुंबई येथे उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. आता सर्व जबाबदारी ही पंकज वर पडली.
     एकाच महिन्यात  गावात तीन जणांचा जीव गेल्याने आमोदा गाव ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या