मुंबई | Mumbai
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ‘परिणिता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. आज सकाळी, २४ मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नीतू चंद्रा श्रीवास्तव यांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. प्रदीप सरकार यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी ते आता या जगात नसल्याचं वृत्त दिलं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अनुदान; काय आहेत अटी व शर्ती?
सोशल मीडियावर लोक त्यांना श्रद्धांजली देत आहेत. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरकार यांच्या निधनाची बातमी सिनेसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली असून दिग्दर्शकाच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
प्रदीप यांनी २००५ मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी २००७ मध्ये ‘लागा चुनरी मे दाग’, २०१० मध्ये ‘लफंगे परिंदे’, २०१४ मध्ये ‘मर्दानी’ आणि २०१८ मध्ये ‘हेलिकॉप्टर ईला’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. प्रदीप यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट बनवले, मात्र त्यांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. चित्रपटांशिवाय त्यांनी ‘फोरबिडन लव्ह’ आणि ‘दुरंगा’ यांसारख्या वेब सीरिजचंही दिग्दर्शन केलं आहे.
RRR च्या ‘नाटू नाटू’ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
प्रदीप हे जाहिरातीच्या क्षेत्रातही सक्रिय होते. ‘धूम पिचाक धूम’, ‘माएरी’, ‘अब के सावन’ यांसारखे सुपरहिट म्युझिक व्हिडीओसुद्धा त्यांनीच शूट केले होते. राजकुमार हिरानीसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी त्यांनी को-एडिटर म्हणून काम केलं होतं.
Onion Farmers :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर