Monday, April 28, 2025
Homeनगरबहिणींना दिले पण दाजींचे काय ?

बहिणींना दिले पण दाजींचे काय ?

खा. अरविंद सावंत यांची राज्य सरकारवर खोचक टीका

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सरकार मनाला येईल ते करतय. कोर्टाने देखील सरकारला फटकारले आहे. राज्य कर्जात बुडालेले असतांना देखील लाडक्या बहिणीसाठी 46 हजार कोटी दिले जाणार असल्यामुळे ते कर्ज काढणार आहे. खरा वायदा 15 लाखाचा आहे. पंधराशे रुपयांवर आले आहे का? बहिणींना दिले दाजींचे काय? दाजी तर उपाशी आहे अशी टिका अरविंद सावंत यांनी केली. खा.अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी मंगळवारी समाधीचे दर्शन (Sai Samadhi Darshan) घेतले.

- Advertisement -

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी विश्वस्त सचिन कोते, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, नाना बावके, सुयोग सावकारे, अमोल गायके, पुंडलिक बावके, शुभम वाघे, सागर कोते यांनी त्यांचा सत्कार केला. माध्यमांशी बोलताना खा. सावंत म्हणाले, रवी राणा यांच्या पोटातील विष आता होटावर आले आहे. महाराष्ट्राने याची दखल घेतली पाहिजे. मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) लाडक्या बहिणी योजनेचे पुढे काय झाले याची माहिती घ्या.

निवडणुक (Election) पुरत हे सोंग आहे या सोंगा पासून सावध राहा. बहिणीनो पैसे घ्या सोडू नका. मात्र प्रत्यक्षात किती लाडक्या बहिणीना याचा लाभ मिळतो हेही पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेचा पैसा आहे. सरकारचा खिशातील नाही. ही योजना फक्त निवडणूक होई पर्यंत आहे. या आधीही निवडणूक झाल्या की अशा योजना बंद पडतात. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राला (Maharashtra) लुटला जात आहे. जण माणसांचे डोळे उघडले पाहिजे. लोकसभेचा (Loksabha) वेळी जे कर्तव्य जनतेने दाखवले तेच आता विधानसभेला दाखवतील. दररोज एक कारखाना बाहेर राज्यात जातोय. कालही महाराष्ट्रातील महिंद्राचा एक कारखाना गुजरातला पाळविण्यात आला. राज्यातील तरुण मंडळीने करायचे काय ? अशा वेळी सत्तेवर बसलेले ब्र सुद्धा काढलायला तयार नाही. त्यामुळे यांना सत्तेवरून दूर करण जनतेचे परम कर्तव्य आहे. यासाठी शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) चरणी प्रार्थना करण्यासाठी आलो असल्याचे खा.सावंत यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...