Wednesday, May 29, 2024
Homeनगरकोण तयार आहे यापेक्षा पक्षाचा उमेदवार कोण त्याला खासदार बनवा

कोण तयार आहे यापेक्षा पक्षाचा उमेदवार कोण त्याला खासदार बनवा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोण तयार आहे, कोण नाही, यापेक्षा पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला खासदार बनवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, आपल्याला दोन नंबरचं काम करायचं नाही, तर एक नंबरच काम करायचं आहे, असे म्हणत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना टोला लगावला.

- Advertisement -

पाथर्डी येथील पोलीस वसाहत येथे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ग़हनिर्माण व कल्याण मंडळ अंतर्गत 23 कोटी 81 लक्ष रक्कमेच्या पोलीस वसाहत व पोलीस स्टेशन इमारतीच्या कामाचे उद्घाटन प्रसंगी विखे बोलत होते. मोहटादेवी दर्शन आरतीप्रसंगी आ. निलेश लंके यांच्यासमवेत पूजा केल्यानंतर आ. राम शिंदे यांनी लोकसभेसाठी आपली तयारी झाली असल्याचे वक्तव्य केले होते याचा समाचार घेत नाव न घेता खा. विखे यांनी टोलेबाजी केली.

यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, सहा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस कल्याणचे इंजि. अरुण नागापुरे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, माजी जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे, अभय आव्हाड, माणिक खेडकर, दीपक जाजू, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, काशिबाई गोल्हार, मंगल कोकाटे, बाबा राजगुरू, वैभव खलाटे, विष्णूपंत अकोलकर, रवींद्र वायकर, अजय रक्ताटे, अ‍ॅड. प्रतिक खेडकर, अशोक चोरमले, बजरंग घोडके, प्रविण राजगुरु, महेश बोरुडे उपस्थित होते.

विखे म्हणाले, लोकप्रतिनिधींमुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवनामध्ये काय बदल झाला हे महत्त्वाचे आहे. फक्त फोटो आणि आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस गेले आहेत. राजकारणामध्ये संधी फार महत्त्वाची असते ती मिळाल्यानंतर तिचा जनतेसाठी कसा उपयोग करून देता येईल यावर लोकप्रतिनिधींचे भविष्य अवलंबून असते. दक्षीण उत्तरेचा कुठलाही वाद नाही.

आ. राजळे म्हणाल्या, पोलीस वसाहत व पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा होता. तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता नव्याने दोन पोलीस स्टेशन होण्यासाठी खासदार विखे, माजी मंत्री कर्डिले व मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, असेही यावेळी आमदार म्हणाल्या. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी खासदार व आमदारांच्या कामांची स्तुती करत पोलीस ठाण्यास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करून आभार संतोष मुटकुळे यांनी मानले.

ऊसतोड कामगार मुलांसाठी 2 वसतिगृहे

शहरामध्ये आणखी शंभर बेडचे ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाकरिता दोन वसतिगृह मंजूर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी विखे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या