अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वडगाव गुप्ता (ता.नगर) येथे 600 एकरावर फेज 2 आणि शिर्डी येथे 500 एकरांच्या एमआयडीसींना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चालू आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या एमआयडीसीसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासकीय आढावा घेतला. यावेळी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुरूवारी (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, भूसंपादन अधिकारी पल्लवी निर्मळ, ज्योती सावंत, बालाजी क्षीरसागर, एमआयडीसीचे अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक मुंबईत झाली होती. यात वडगाव गुप्ता (ता. नगर) येथे 600 एकर जमीन फेज 2 साठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. शिर्डी येथील शेती महामंडळाच्या 500 एकर जमिनीवर दुसरी एमआयडीसीस तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही एमआयडीसीसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. ही जागा एमआयचडीसीकडे हस्तांतरीत केल्यावर रस्ते, जलवाहिन्या, वीज, ड्रेनेज व्यवस्था या मूलभूत सुविधांची उभारणी होणार आहे.
त्यानंतरच प्रत्यक्षात उद्योगांनी हे भूखंड देता येणार आहेत. भूसंपादनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने खा. डॉ. विखे पाटील यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. त्याच जिल्हा नियोजन योजनेतील कामांचा ही आढावा घेतला. जिल्हा नियोजन योजनेतील निधीतून रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, शाळा खोल्यांचे नुतणीकरण आदी कामे सुरू आहेत. या कामांचा ही आढावा घेतला. यासह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी, पशूसंवर्धन विभागाकडून करण्यात येणार्या उपाययोजना कामांचा आढावा घेण्यात आला.