Tuesday, May 14, 2024
Homeनगरभ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नये म्हणून अजित पवारांची वक्तव्ये - खा. डॉ....

भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नये म्हणून अजित पवारांची वक्तव्ये – खा. डॉ. विखे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

मागील अडीच वर्षांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नयेत म्हणून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अशी वक्तव्ये करत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी येथे केला.

- Advertisement -

श्रीगोंदे येथे अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी खा. विखे यांनी पेडगाव येथील धर्मवीरगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. विखे म्हणाले, पेडगाव मधील धर्मवीर गडावर जाऊन आक्रमकांनी फोडलेले मंदिर पहावे आणि धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासावा. आमच्यासाठी धर्मवीर शब्द महत्त्वाचा आहे. याबाबत वक्तव्य करत विरोधीपक्ष नेत्यांची मानसिकता लक्षात येते राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्यासाठी केलेल्या विकास कामांना मागे टाकण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे.

राहुरी मधील ब्राम्हणीमध्ये हिंदू समाजाच्या माहिलांना आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचं प्रयत्न झाले. राष्ट्रवादीमधील अनेकजण औरंगजेबचे समर्थन करत आहेत. आक्रमकांच्या कबरीचे नूतनीकरण महाविकास आघाडीने केले धर्माच्या भावनेला ठेच पोहचण्याच काम विरोधी पक्ष नेत्यांनी केले असे अरोपही त्यांनी केले.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, संदीप नागवडे, अनिल ठवाल, राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, दादाराम ढवाण, टिळक भोस, दत्ताजी जगताप, आदित्य अनवणे आदींची भाषणे झाली. यावेळी रमेश गिरमकर ,प्रताप पाचपुते, बाळासाहेब महाडिक आदी उपस्थित होते.

..तर विभाजनाला पाठिंबा

जिल्हा विभाजन करून दक्षिण जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार असेल, कुकडीचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार असेल तर जिल्हा विभाजनासाठी आपला पाठिंबा असेल. आपल्याला विकासाच्या माध्यमातून पुढे जायचे आहे. जिल्ह्याला नाव काय द्यायचे हे एकटे विखे ठरवू शकत नाही. जिल्ह्याच्या नामांतराची भूमीका सर्वसामान्य जनता ठरवेल तीच आमची भूमिका असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या