Saturday, July 27, 2024
Homeनगरनव्या श्रीरामपूरच्या निर्माणासाठी प्रयत्न करणार - खा. डॉ. विखे

नव्या श्रीरामपूरच्या निर्माणासाठी प्रयत्न करणार – खा. डॉ. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेती महामंडळाची जागा विकसित करून तेथे तीन हजार घरकूल व श्रीरामपूर नगरपालिकेची नवीन इमारत तयार होणार आहे. श्रीरामपूरच्या नवनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथे होणार्‍या कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दि. 31 ऑगस्ट येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त होणार्‍या कार्यक्रमास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग प्रवरानगर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे निमंत्रण आणि पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, प्रकाश चिते, नाना पवार, नाना शिंदे, रामभाऊ लिप्टे, मारुती बिंगले, सुनील वाणी, शरद नवले, रवी पाटील, सतीश सौदागर, विशाल अंभोरे, मंजुषा ढोकचौळे, पुजा चव्हाण, नितीन कापसे, गणेश राठी आदी उपस्थित होते.

खा. विखे पाटील म्हणाले की, नाफेड कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन केंद्राने शेतकरी हिताचा निर्णय घेतला. तरीही विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जातात. राज्याचे नेते म्हणवणारे अनेक वर्ष त्या खात्याचे मंत्री होते. मात्र, त्यांनी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात नाफेडच्या माध्यमातून कांद्याची स्थिर दरात खरेदी केली नाही. त्यांनी कधीही असा शेतकरी हिताचा निर्णय घेतला नाही, अशी टीका केली. शेतकर्‍यांना न्याय देणारे आणि सर्वसामान्य जनतेसाठी चांगले निर्णय घेणारे सरकार म्हणजे मोदी सरकार असल्याचे खा. विखे म्हणाले.

श्रीरामपूरच्या बाबतीत फक्त वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काम काहीच केले जात नाही. बेलापूर व दत्तनगर शीवबाबत निर्णय घेऊन शीवरस्ता केला जाणार आहे. एकमेकांना जोडले जाणारे सर्व रस्ते हे पक्के व डांबरी केले जातील. कोणाला काय चर्चा करायच्या त्या करू द्या, त्याचा विचार करू नका. शिर्डी येथे झालेला शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम राज्यात सर्वात मोठा आणि चांगला झाला. तसाच लोणीचा हा कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहनही खा. विखे यांनी केले.

पालिकेची 25 कोटीची इमारत उभी करणार

शहरातील पालिकेची इमारत जुनी झाली असून शेती महामंडळाच्या जागेत नगरपालिकेच्या कार्यालयाचा आराखडा तयार केला आहे. त्या ठिकाणी 25 कोटींची नवीन इमारत उभी करणार असल्याचे आश्वासन खा. विखे यांनी दिले. सद्या श्रीरामपुरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. गरिबांना घरे नाहीत, अशा प्रत्येकाला शेती महामंडळाच्या जागेत तीन हजार घरे बांधून देणार आहे. ही घरे दोन महिन्याच्या आत पूर्ण करून दिली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या