Saturday, July 27, 2024
Homeनगरनिवडणुकीत विखे-तनपुरे युतीमुळे राजकीय नाट्य रंगले

निवडणुकीत विखे-तनपुरे युतीमुळे राजकीय नाट्य रंगले

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडीनंतर खा.डॉ.सुजय विखे व माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गटाची युती होऊन उपसरपंचपदी डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांची पुतणी सिमा दारकुंडे या दहा मतांनी विजयी झाल्या. यावेळी डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे व साहेबराव दुशिंग हे युतीचे शिल्पकार ठरले आहेत.

- Advertisement -

उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आदिनाथ सेवा मंडळ विरूद्ध गणराज सेवा मंडळ अशी लढत झाली. यात आदिनाथ सेवा मंडळाला सहा जागा तर गणराजला नऊ जागा मिळाल्या. मात्र, सरपंचपद हे आरक्षित निघाल्याने त्याठिकाणी आदिनाथ सेवा मंडळाचे सुरेश साबळे यांची वर्णी लागली. तर उपसरपंचपदी गणराजकडे बहुमत असल्याने बापूसाहेब दुशिंग यांची निवड करण्यात आली. सुमारे दीड वर्षापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सत्तेचा संघर्ष सुरू होता. या काळात अनेक विकासाच्या कामाला अडथळे निर्माण झाले.

पुन्हा विकासकामे खुंटू नये म्हणून राजकीय जोडे बाजूला ठेवून आदिनाथ सेवा मंडळाचे नेते व डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे यांच्याबरोबर गणराज मंडळाचे नेते व कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांनी आपल्या सदस्यांसह आदिनाथ मंडळाबरोबर युती करून सत्तासंघर्ष मिटविण्यासाठी व विकासकामे होण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यातच गणराज मंडळाचा दुसरा गटाच्या चार सदस्यांनी आपले अस्तित्व अबाधित ठेवून एकसंघ राहून त्या गटाचे कैलास अडसुरे, गणेश ढोकणे यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरले. आदिनाथ मंडळाकडून सौ.दारकुंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने यावेळी गणेश ढोकणे यांनी माघार घेतली. सौ. दारकुंडे व अडसुरे यांच्यात लढत होऊन दारकुंडे यांना दहा तर अडसुरे यांना चार मते पडली. यावेळी दारकुंडे यांना उपसरपंचपदी घोषित करण्यात आले.

यावेळी रतनबाई ढोकणे, निता ढोकणे, सुनीता वाघ, सुवर्णा पंडित, विजया ढोकणे, सारिका ढोकणे, बापूसाहेब दुशिंग, आदिनाथ पटारे, संजय अडसुरे, साहेबराव गायकवाड, भाऊराव ढोकणे, मच्छिंद्र ढोकणे, किसनराव पटारे, विश्वनाथ दुशिंग, राजेंद्र ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, उंबरे सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय ढोकणे, भास्कर ढोकणे, बाबासाहेब दारकुंडे, आप्पासाहेब ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, गंगाधर अडसुरे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय ढोकणे, भाऊ सासवडे, एकनाथ दुशिंग, मारूती ढोकणे, एकनाथ वाघ, संजय महाडिक, शिवाजी अडसुरे, संदीप दुशिंग, विजय माळवदे आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी काम पाहिले.

उंबरे गावच्या विकासकामासाठी काही विघ्नसंतोषींमुळे खीळ बसली होती. कोणत्याही विधायक कामाला सतत आडवे पडण्याचे आडमुठे धोरण घेऊन सरपंचांसह, उपसरपंच व ग्रामसेवकांना त्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे अनेक अधिकारीही या गावच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करीत होते. हे राजकीय षडयंत्र रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो.

– साहेबराव दुशिंग, माजी संचालक, डॉ.तनपुरे कारखाना.

गावचा एकोपा रहावा, त्यामुळे विकासकामाला चालना मिळते. सत्तासंघर्ष करून गावच्या पदरात विकास पडत नाही. या संघर्षात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या यापुढे होणार नाही. यापुढे विकासकामांसाठी सवार्ंनी एकत्रित येण्याचे आवाहन डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक प्रा.दत्तात्रय अडसुरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या