नागपूर |Nagpur –
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र छातीत दुखत असल्याने आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. MP Navneet Kaur-Rana
- Advertisement -
खासदार नवनीत कौर राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे अशा कुटुंबातील 12 जणांना करोनाची लागण झाली आहे. कुटुंबीयांवर अमरावतीत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 6 ऑगस्टला नवनीत राणा यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.