Sunday, September 29, 2024
Homeनगरवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आरोग्य-महसूलची संयुक्त बैठक बोलवा

वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आरोग्य-महसूलची संयुक्त बैठक बोलवा

जिल्हा रुग्णालयात आढावा बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील प्रस्तावित जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबतचा प्रस्ताव आरोग्य – महसूल विभागाच्या संयुक्त बैठकीत केला जाणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगून संयुक्त बैठक बोलविण्याचे निर्देश दिले आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालये व धर्मादाय आयुक्तालया अंतर्गत चालवण्यात येणार्‍या रुग्णालयांचा आढावा खा. लंके यांनी घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना (ठाकरे गटाचे) संभाजी कदम, दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अभिनय गायकवाड, गौरव घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

अपंगांची शिबिरे विळद घाटातील विखे फाउंडेशनमध्ये का घेतली जातात? जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये का घेतले जात नाहीत? असा सवाल उपस्थित करून खा. लंके म्हणाले, धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये आरक्षित खाटा ठेवण्यात येतात मात्र काही रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ दिला जात नाही. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य प्रकारची अंमलबजावणी करावी, जिल्हा आयुष रुग्णालय मोठे आहे. मात्र अजूनही ते पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. याबाबत मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरावा करून तेथील अडचणी दूर करून हे रुग्णालय खुले केले जाईल.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुरूडगाव रस्ता येथे जागा आहे. हा विषय माझ्या मुख्य अजेंड्याचा असून, या जागेबाबत संयुक्त बैठक बोलवा, असे निर्देश खा. लंके यांनी दिले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दरवर्षी धर्मादाय आयुक्तालयाकडून चालवण्यात येणार्‍या विखे फाउंडेशनला 40 कोटी रुपये दिले जातात. हे उत्पन्न मात्र दाखवले जात नाही. उत्पन्नाच्या 2 टक्के निधी खर्च करणे अपेक्षित आहे मात्र तेथे हे होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या