Friday, May 16, 2025
HomeनगरAhilyanagar : खा. लंकेंनी अधिकार्‍याच्या लगावली कानशिलात

Ahilyanagar : खा. लंकेंनी अधिकार्‍याच्या लगावली कानशिलात

अधिकार्‍यांकडून इन्कार || श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हायहोलटेज ड्रामा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

आढळगाव ते जामखेड टप्प्याच्या अपूर्ण कामाबाबत सुरू असलेल्या उपोषणात खा. निलेश लंके यांनी संतप्त होवून थेट राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्‍यांच्या कानाखाली ठेवून दिली. दरम्यान, या प्रकरानंतर संबंधीत अधिकार्‍यांकडून घडलेल्या बाक्या प्रसंगाबाबत इन्कार केला असला तरी लंके समर्थकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत दावा करण्यात आला आहे. या प्रकारानंतर काम अपूर्ण ठेवणार्‍या रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हायहोलटेज ड्रामा रंगला.

राष्ट्रीय महामार्ग 548 डी वरील आढळगाव ते जामखेड या रस्त्याच्या अपूर्ण काम व रखडलेल्या टप्प्यासाठी सतत आंदोलन करूनही अधिकार्‍यांकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत नसल्याने खा. निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंद्याचे अध्यक्ष सुभान तांबोळी 13 मेपासून आढळगाव येथे उपोषणाला बसले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खा. लंके गुरूवारी आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदाराला कामाच्या दिरंगाईबाबत जाब विचारत त्यांना थेट अधिकार्‍यांच्या कानशिलात लगावत चोप दिला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत अधिकार्‍यांनी चुपी साधत, रस्त्याचे काम अपूर्ण ठेवणार्‍या ठेकेदारावर कारवाईसाठी खासदारासह उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गर्दी. यावेळी चांगलाच राजकीय हायहोलटेज ड्रामा रंगला.

गेल्या वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग 548 डीचे काम सुरू आहे. परंतू ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शनने आढळगाव गावठाण नजीक बसस्थानकावर एक किलोमीटर व वालवडपर्यंत टप्यात सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण व अस्ताव्यस्त उकरून ठेवले आहे. यामुळे या परिसरात जवळपास 10 ते 12 निष्पाप व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर शेकडोजन जायबंदी झाले आहेत. या आधीही तांबोळी यांनी तीन वेळा उपोषण केले होते. यावेळीही खा. लंके यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

प्रत्येकवेळी आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने गुरूवारी आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी खा. लंके अधिकार्‍यांना पाहून संतापले व राग अनावर न झाल्याने त्यांनी थेट अधिकार्‍यांवर हात उगारला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अजित गायके, सदानंद शिंदे- निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर सदानंद शिंदे व राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता शेवाळे यांना खा. लंके यांनी आपल्या गाडीत बसवून थेट श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले व रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यातच फरशीवर ठिय्या मारला. त्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात हायहोलटेज ड्रामा सुरू होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : संगमनेर येथे 38 वेठबिगार व 31 बालकामगारांची मुक्तता

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखाणीवर काम करणार्‍या 38 वेठबिगार कामगार व 31 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली....