Tuesday, September 17, 2024
Homeनगरकांदा, दूध दरवाढीसाठी शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली

कांदा, दूध दरवाढीसाठी शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली

खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे वेधले लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कांदा (Onion) व दूध दरवाढीसाठी (Milk) खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसर्‍या दिवशीही जनआक्रोश आंदोलन (Movement) सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला जनावरांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. शेतकर्‍यांनी आंदोलनस्थळी गाई-म्हशी दावणीला बांधले असून, शेळ्या-मेंढर देखील सोबत आनले आहेत. दरम्यान, खा. लंके (MP Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली तिसर्‍या दिवशी जनआक्रोश आंदोलन निमित्त शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर (Farmer Tractor) घेऊन शहरातील रस्त्यावर उतरले होते. सरकार विरोधी घोषणा बाजी यावेळी देण्यात आली.

दूधाला 40 रूपये व कांद्यासह शेतकर्‍यांच्या इतर शेतीमालाला हमीभावासाठी पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढून सरकारचा निषेध नोंदावला. यावेळी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. या दरम़्यान शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दूधदरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खा. लंके (MP Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (5 जुलै) शेतकरी जनआक्रोश आंदोलन (Movement) सुरू केले आहे. शासनाने दुधाला 40 रूपये हमीभाव द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे. मात्र प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे हे आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरू होते. शेेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच जनावरे बांधली होती.

दरम्यान, रविवारी सकाळपासूनच शेतकर्‍यांनी आपली ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) परिसरात आणली होती. दुपारच्या वेळी ट्रॅक्टर रॅलीला सुरूवात झाली. खा. लंके, त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवित रॅलीत सहभाग घेतला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागुन गुलमोहर रस्त्याने सूरभी हॉस्पिटल, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार हार घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून टिळक रस्त्याने नेप्ती नाका, दिल्ली गेट, आप्पू हत्त्ती चौक लालटाकी, पत्रकार चौक, डीएसपी चौकातून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यातील शेतकरी तथा राजकीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या