Saturday, November 7, 2026
HomeनाशिकMP Rajabhau Waje : आपला दवाखाना, महालॅबच्या सेवा बंद राहणे दुर्दैवी; मुख्यमंत्र्यांनी...

MP Rajabhau Waje : आपला दवाखाना, महालॅबच्या सेवा बंद राहणे दुर्दैवी; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची खासदार वाजेंची मागणी

नाशिक | Nashik

राज्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महालॅबमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील आरोग्य सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

संबंधित सेवा पुरवठादार संस्थेची शासनाकडील (Government) देयके मागील काही वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट परिणाम गरीब, सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांवर होत असून, मोफत उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय तपासण्यांसाठी नागरिकांना आता खासगी प्रयोगशाळांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

विशेषतः नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. डायलिसिससारख्या जीवनावश्यक उपचारांमध्ये खंड पडल्यास रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासन आणि सेवा पुरवठादार संस्थेमधील आर्थिक व्यवहारांचा फटका सामान्य रुग्णांना बसता कामा नये, अशी भूमिका खासदार वाजे यांनी मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रे (UHWC) आणि डायलिसिस केंद्रांमधील महालॅबच्या सेवा तातडीने सुरू कराव्यात, संबंधित संस्थेची प्रलंबित देयके नियमानुसार अदा करावीत, बंद असलेले आपला दवाखाना केंद्र सुरू करावेत तसेच डायलिसिस रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. याशिवाय संबंधित विभाग आणि सेवा पुरवठादार संस्थेची संयुक्त बैठक घेऊन आरोग्य सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशीही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

शासन आणि सेवा पुरवठादार संस्थेमधील आर्थिक व्यवहारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होणे अजिबात योग्य नाही. विशेषतः डायलिसिससारख्या जीवनावश्यक उपचारांमध्ये खंड पडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून महालॅब आणि आपला दवाखाना येथील सर्व आरोग्य सेवा विनाविलंब पूर्ववत सुरू कराव्यात.

राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

ताज्या बातम्या

भंगार

येवल्यात आग्नी तांडव; भंगार गोदाम जळून खाक, लाखोंचे नुकसान

0
येवला | प्रतिनिधीशहरातील अंबिया शाह कॉलनी परिसरात शनिवारी (दि. ७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. उस्मान भंगारवाले यांच्या भंगार...