Tuesday, April 29, 2025
Homeराजकीय...तर दोन काय चार बायका संभाळू शकतो !

…तर दोन काय चार बायका संभाळू शकतो !

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

ज्या नवर्‍यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना शनिवारी नगरमध्ये दिले आहे.

- Advertisement -

दुध दरासाठी भाजपने शनिवारी पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचर्‍या शब्दांत टीका केली होती. करोना महामारीच्या काळात शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

शेतकरी, दूध उत्पादक रस्त्यावर आले आहेत. विजेची बिले अव्वाच्या सव्वा येताहेत. खतांसाठी रांगा लागल्या आहेत. या सरकारला जनतेशी आणि शेतकर्‍यांशी काहीही घेणे देणे नाही. एका नवरा आणि दोन बायका अशी या सरकारची अवस्था आहे. या तिघाडीचा खेळ आता आवरत आला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असे शिंदे म्हणाले होते.

त्यानंतर नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शिवसेनेचे खा. सदाशीव लोखंडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी शिंदे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. खा. लोखंडे म्हणाले, ज्या नवर्‍यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो.

आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत. दूध दराच्या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारनेही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले पाहिजे, अशी खासदार म्हणून माझीही भूमिका असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

१००

RBI On ATM Cash: १००, २०० रुपयांच्या नोटांबाबत आरबीयाने घेतला महत्वाचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी सर्व बॅंका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएम सेंटरमध्ये १०० तसेच २०० रुपयांच्या जास्त नोटा...