Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधून शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नाशिकमधून शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नाशिक

- Advertisement -

नाशिकमधील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पेरणी सुरु झाली आहे. राज्य सरकारच्या व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतूक करत शतप्रितिशत शिवसेना हा आपला नारा कायम असल्याची घोषणा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सकाळी शिवसेना कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद त्यांनी साधला. यावेळी ते म्हणाले, “सरकारचे दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. अजून तीन वर्ष राहिली आहेत. ते सुद्धा आपलेच असणार आहे. मतदार संघ कोणाकडे आहे हा विचार तुम्ही करु नका. शतप्रतिशत शिवसेनेचा आपला नारा आजही कायम आहे. यावेळी काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्या स्वळाच्या नाऱ्यावर त्यांनी टिप्पन्नी केली.

उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतूक

कार्यकर्त्यांमध्ये जाेश निर्माण करण्यासाठी राऊत यांनी सरकारच्या कामगिरीची कौतूक करत त्याची दखल जगात व सर्वोच्च न्यायालयात कशी घेतली गेली याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “ राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची दखल देशात नव्हे जगात घेतली गेली. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात कोरोनासंदर्भात याचिकेवर सुनवाणी झाली. त्यावेळी पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने मुंबईतील कामगिरीचे कौतूक केले. अलाहाबाद उच्च न्यायालय व गुजरात उच्च न्यायालयानेही ठाकरे यांच्या कामांचे कौतूक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या प्रकारे काम करतात त्या पद्धतीने काम का होत नाही? असे तीन वेळा न्यायालयाने सांगितले. आपले कौतूक विरोधी पक्ष करत नाही. परंतु देशातील न्यायालयाने त्याचे कौतूक करत आहे. हे कौतूक आपल्याला मिळालेली पोहचपावती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या