Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांचा मंत्री केसरकरांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, थेट बुटाने मारले पाहीजे…

संजय राऊतांचा मंत्री केसरकरांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, थेट बुटाने मारले पाहीजे…

मुंबई | Mumbai
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच राज्यातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संतापात आणखीनच भर पडत आहे. मंगळवारी राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी मालवण येथे जाऊन पुतळ्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुतळा पडला ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल, वक्तव्य केले. ज्यावर आता खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसे आमच्यातून निघून गेली, हे बरेच झाले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी पुतळा दुर्घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महायुतीतील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही राज्याच्या मनावर झालेली जखम आहे. असे असताना काही मंत्री मात्र बरे झाले पुतळा पडला. त्यातून चांगले होईल, अशी विधाने करत आहेत. अशी विधाने करणारे लोक हे अफजल खानाची औलाद आहे. ही माणसे मिंध्यांनी पोसली आहेत. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. हे सडक्या विचाराचे लोक आहेत. बरे झाले ते आमच्यामधून गेले. ही घाण आमच्यातून गेली हे बरे झाले, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. हे सगळे शिवाजी महाराजांचे का इतके शत्रू झालेत, हे माहिती नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. मिंधे यांची टोळी पोसण्याचे काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ही शिंदेंची गँग आहे. फडणवीस त्यांची वाहवा करत आहे. त्या मंत्र्याला बुट मारले पाहिजे. फडणवीस सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी केसकरला बुटाने मारले पाहिजे, असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे.

नारायण राणेंवर टीका
नारायण राणे या माणसाला वेड लागले आहे. इमारती कोसळणे आणि पुतळा कोसळणे यामध्ये फरक आहे. राणे तुम्ही मराठी खासदार असून, असं बोलताय. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आरोप नाही तर हे सत्य आहे. अशी ही टीका राऊतांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या