मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी व्यापारी आणि दुकानदारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. “अमित शाह खोटे बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटे बोलतो”, ही खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका नव्या वादाचे कारण ठरली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले, महाराष्ट्रात जो राजकारणाचा चिखल केला आहे, त्याला जबाबदार अमित शाह, त्यांची व्यापारी आणि खा खा वृत्ती आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी आणि ओरबाडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांत अमित शाह यांच्यासारख्या व्यापाऱ्यांनी जे षड्यंत्र रचले, त्यामुळे महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडले. मात्र, त्यांच्या या विधानाने व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे. व्यापारी हा खोटारडा असतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या टिप्पणीवर व्यापारी वर्गाकडून आक्षेप घेतला जातोय आणि भाजपानेही त्यावरून संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.
त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करताना व्यापारी आणि दुकानदार वर्गाबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने राऊतांच्या वक्तव्याचा फटका शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे वक्तव्य संजय राऊतांनी केले.
काय म्हणाले संजय राऊत?
अमित शाह खोटे बोलत आहेत. व्यापारी नेहमी खोटे बोलतो, दुकानदार हा आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो अथवा भेसळ करतो. ग्राहकाला फसवतो. कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेने कधीही विरोध केला नाही. अमित शहा हे खोटे बोलत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
प्रविण दरेकर यांची राऊतांवर टीका
संजय राऊतांनी शिवसेनेचे व्यापारीकरण केले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात फरक आहे. व्यापारी आणि दुकानदार या देशाचे नागरिक आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याने संपूर्ण व्यापारी-दुकानदार वर्गाचा अपमान झाला आहे. दुकानदारांनी संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घ्यावा आणि महायुतीच्या बाजूने उतरावे, असा पलटवार भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा