Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याबेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा - राऊत

बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा – राऊत

मुंबई |Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Issue) चिघळा असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकात उमटत आहे. कर्नाटकमध्ये काल महाराष्ट्राच्या बसेसची (Bus) तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसला काळे फासले होते. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा, अन्यथा महाराष्ट्राला कठोर पाऊलं उचलावी लागतील, मग तुमचं सरकार खड्ड्यात गेलं तरी चालेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला

पुढे ते म्हणाले की, ज्या पद्धतीने सीमाभागांत सरकारी प्रेरणेने जे काही सुरु आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे. तसेच प्रतिकार करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक (Arrested) करुन तुरुंगात डांबले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस (DCM Devandra Fadnavis) केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. पण काय उपयोग आहे? असेही त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणून शिवसेनेचे सरकार घालवण्यात आले. अशी वेळ महाराष्ट्रावर कधी आली नाही. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार महाराष्ट्राने गेल्या ५५ वर्षांत पाहिलेले नाही. काल दोन मंत्र्यांनी शेपूट घातले. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार असे म्हणत संजय राऊतांनी सरकारला लक्ष्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या