Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीमध्ये असलेले संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

“देशाच्या राजकारणात चिन्ह गेल्याची ही काही पहिली वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यादेखील अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीन वेळा त्यांच्या पक्षाचेही चिन्ह बदलले गेले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्षाचं चिन्ह गोठवणे काही नवीन नाही. बहुदा नवे चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवून आणेल. भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. कारण आमच्यात शिवसेनेचं स्पिरीट आहे,” अस संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

तसेच, “अंधेरी निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण व नाव हे शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रात सध्या संतापाचे वातावरण आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवसेनेच्या या वर्षीच्या दसरा मेळाव्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने हजर राहू न शकल्याने आज शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालया परिसरात उपस्थित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या