मुंबई | Mumbai
शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली होती. त्यावर उत्तर देतांना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर आता राऊत यांनी संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले आहे…
ते म्हणाले की, मला कोणी ‘गद्दार’ म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील, तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)अपमान करणाऱ्या भाजपाचे (BJP) राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचे कौतुक करेल, असे आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदार गायकवाड यांना दिले आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि गायकवाड यांच्यातील टीका शिवीगाळ पर्यंत येऊन ठेपली असून राऊतांनी गायकवाड यांना दिलेले आव्हान आमदार संजय गायकवाड स्वीकारतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.