नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला बुच लावण्याचे काम फडणवीस करत आहेत. राजकारण्यांमध्ये पैशाचा जोर वाढला आहे, निष्ठावंतांची खरी फळी शिवसेनेकडे (Shivsena) आहे. येत्या महिन्याभरात नाशकात (Nashik) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे महाशिबिर होणार आहे. या शिबिरांमधून आगामी निवडणुकांसाठीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे स्पष्ट केले.
शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी खा. संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकमध्ये दोन दिवसापासून मुक्कामी असून, विविध स्तरावर त्यांनी पदाधिकार्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) वाचाळांवर जहरी टीका केली. महाराष्ट्राचा (Maharashtra) विध्वंस करायला निघालेल्या विध्वंसक शक्तीचा नायनाट करण्याचे बळ आमच्याकडे आहे. दिल्लीच्या मोगलाईशी हात मिळवणी करून राज्यात सूरु असलेल्या खेळाला रोखण्याची व संपवण्याची ताकद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे. ‘तुमचं हे फडफडणं तात्पुरता असून, सत्ता आल्यामुळे तुमची फडफड आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावे लागेल’ असा स्पष्ट इशारा हा राऊत यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना नाव न घेता दिला.
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “आगामी काळात अधिवेशन (Convention) होणार असून, त्यासंदर्भात दिशा मिळावी यासाठी काल मातोश्रीवर बैठक पार पडली. शिवसेनेचं बळ २० आमदारांचं आहे. याआधी याहून कमी संख्या असतानाही विरोधीपक्ष नेतेपद मिळालेलं आहे, याकडे राऊतांनी लक्ष वेधत आम्ही या पदावर दावा सांगणार असून, विधानसभा अध्यक्षांना संविधानाविषयी चाड असावी त्यामुळे ते आमची भूमिका ते मान्य करतील”, असे त्यांनी म्हटले.
यावेळी राऊतांनी शिंदेंच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, “शिंदेंच्या काळात भ्रष्टाचार झाले. आरोग्यमंत्री शिंदेंच्या पक्षाचे होते. त्यांच्या कार्यकाळातीलही भ्रष्टाचार समोर आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी त्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल. फडणवीस भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू असेही राऊत म्हणाले. तसेच जवळीक निर्माण करण्यासाठी आम्हाला फडणवीस किंवा भाजपचे कौतुक करण्याची गरज नाही. राज्यात ज्या उत्तम गोष्टी आहे त्याचे कौतुक केलं पाहिजे, हीच तर खरी लोकशाही आहे”, असेही त्यांनी म्हटले.
तर प्रयागराज (Prayagraj) कुंभमेळ्याला स्नानासांठी जाण्याबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, “आम्ही धर्म क्रांतीचे जनक म्हणून गणले जाणार्या सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या भूमिकेवर विसंबलेलो होतो. ते ज्या दिवशी महापर्वणीत स्नान करतील, त्यानंतर लगेचच आम्ही सर्व जण कुंभस्नान करणार होतो. मात्र, सरसंघचालक गेलेच नाहीत. प्रत्यक्षात भाजपचे (BJP) हिंदुत्व हे नकली”, असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली.
कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर आज (दि.१) न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “कायद्याने माणिकराव कोकाटे हे अपात्र ठरले आहे. मात्र, आता त्यांची धडपड मंत्रीपद आणि आमदारकी वाचवण्यासाठी केली जात आहे. याआधी सुनील केदार, राहुल गांधी यांचे पद २४ तासात गेल्याची नोंद आहे. मात्र, कोकाटेंना अभय दिले जात असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा” आरोपही खा. राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
… मग त्या मुलींना प्रशिक्षण द्या
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट प्रकरणाला वेगळ्या पायवाटा फोडल्या आहेत. त्या मुलीने विरोध केला नाही त्या मुलीने प्रतिकार केल्याने असं गृहराज्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यावर बोलताना राऊत यांनी कडवी टीका केली. त्या मुलींना प्रशिक्षण द्या असाही सल्ला त्यांनी गृहराज्यमंत्री यांना दिला. तसेच राज्याला असे गृहराज्यमंत्री मिळाले हे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी सांगितले.