Sunday, January 26, 2025
Homeमुख्य बातम्या...तर भाजपाला राष्ट्रपतींचाही राजीनामा घ्यावा लागेल : संजय राऊत

…तर भाजपाला राष्ट्रपतींचाही राजीनामा घ्यावा लागेल : संजय राऊत

मुंबई | Mumbai

मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे (Tipu Sultan) नाव देण्यात आले आहे. त्यावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. भाजप (BJP) नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

- Advertisement -

भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Presdident Ramnaht Kovind) यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानाचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

टिपू सुलतानाचं काय करायचं हे राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल. तुम्ही म्हणजे इतिहासाचे ठेकेदार नाहीत, हे लक्षात ठेवा. टिपू सुलतान, श्रीरंग पट्टणम, हैदरअली यांच्याविषयी आम्हालाही माहिती आहे. कोणी काय अत्याचार केलेत, हेदेखील आम्ही जाणतो. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तसेच भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागतानाच राज्यात दंगली पेटतील असा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोण करणार दंगली? हिंमत आहे का? जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी करून दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा राऊत यांनी दिला.

नेमका काय आहे वाद?

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते. त्याचवेळी अस्लम शेख यांनी या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलनही केले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या