Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआधी मणिपूरमधील... ; खासदार संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका

आधी मणिपूरमधील… ; खासदार संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका

नवी दिल्ली | New Delhi

मणिपूरच्या (Manipur Violance) विषयावर युरोपियन संसदेत (Europian Union) चर्चा होते, पण भारतीय संसदेत चर्चा होऊ देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्यचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanajy Raut) यांनी मोदी सरकारवर केला आहे. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात. मणिपूरचा विषय गंभीर आहे. असे सांगतानाच तुम्ही समान नागरी कायदा आणताय ना? आधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

- Advertisement -

मणिपूर भारताचा भाग आहे, तेथील लोक देशातील जनता आहे. मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली जाते. ही देशातील १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट असून समान नागरी कायदा आणताय त्याआधी मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्था नीट करा. तेवढी हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.

Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत पुन्हा बचावकार्याला सुरुवात; पाऊस, चिखल, धुक्याचं आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना मणिपूरची हिंसा रोखता आली नाही. त्यामागचं कारण काय असावे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ असतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते काही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. ८० दिवसानंतर पंतप्रधानांनी संसदेबाहेर भाष्य केले.

दिल्लीत निर्भया कांड झाल्यानंतर संपूर्ण सरकार हलवून टाकले होते. त्यावेळी भाजपा विरोधात होती. हिंसाचार थांबवता येत नसेल तर ते सरकारचे पूर्णपणे अपयश आहे असा आरोप त्यांनी केला.

VIDEO : राजस्थानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत

घोटाळा झालाच नाही

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. त्यावर राऊत म्हणाले की, मुंबई कोविड सेंटरने सर्वात उत्तम काम केले. पण विरोधकांच्या पोटात जो गोळा आलेला आहे त्यामुळे त्यांना चांगले काम केल्याचे त्यांना पाहवत नाही. लोकांचे जीव वाचवले. चांगले काम केले. त्याचा फायदा महापालिकेत आम्हाला होईल. त्यामुळे टार्गेटेड लोकांना पकडले जात आहे. हा ज्याचा जवळचा तो त्याचा जवळचा आमचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.

परवा एक महिलेबाबत अश्लिल क्लिप आली ती व्यक्ती फडणवीस, पंतप्रधानांशी जवळीक आहे मग त्यांचा संबंध आहे का? मी इतके भ्रष्टाचाराचे प्रकरणे, पत्रे दिली त्यावर काय कारवाई केली. कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने लोकांचे जीव वाचले. कोर्टासमोर सगळे सत्य येईल. दिशाभूल करण्यासाठी असे आरोप आणि कारवाई केली जाते असे त्यांनी म्हटले.

तर अजित पवार मुख्यमंत्री होतील

खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार भावी आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल.

दरम्यानअजित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील, कायदेशीर, घटनात्मक बाबी आम्हालाही कळतात. लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे सत्य शिंदे गटाने स्वीकारले पाहिजे असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या