Saturday, October 5, 2024
HomeराजकीयSanjay Raut : महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? संजय राऊतांनी स्पष्टच...

Sanjay Raut : महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) तोंडावर आली असून दसऱ्याच्यानंतर (Dasara) आचारसंहिता (Code of Conduct) लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपाबाबत (Seat Allocation) चर्चा सुरु आहे. यातील मविआचे (MVA) जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून ते जाहीर कधी होणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता या जागावाटपाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : आदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष आणि इतर छोटे पक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जिंकेल त्याला उमेदवारी हे आमचे सूत्र आहे. समाजवादी पक्ष (Samajwadi Party) कुठे जिंकतो त्याठिकाणी त्यांना जागा दिली जाईल. जागावाटपाचे आमचे सूत्र हेच आहे. २०० जागा (Seat) लढवणार, १०० जागा लढवणार असे काहीही आमच्यात चाललेले नाही. शिवसेनेला किती जागा? वगैरे प्रश्न नाही. तिन्ही पक्ष आणि पक्षप्रमुख हे संख्येवर बोलतच नाही. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. त्यामुळे दसऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीचे जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल”, असे संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटले.

हे देखील वाचा :  Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहि‍णीं’ची दिवाळी होणार दणक्यात साजरी; ‘या’ तारखेपर्यंत मिळणार दोन महिन्यांचे एकत्रच पैसे

राऊत पुढे म्हणाले की, “आमची प्रत्येक मतदारसंघावर (Constituency) चर्चा सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघात जिंकण्याची गणितं वेगळी आहेत. त्यात अनेक पैलू असतात, त्यामुळे वेळ लागत आहे. आम्ही आकडे घेऊन बसलो तर तासाभरात जागावाटप झाले असते. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. आमच्या जागावाटपासाठी दिल्लीतून कोणाला यावं लागणार नाही. आता महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री येऊन बसलेत. जागावाटपाच्या चर्चेसाठी पंतप्रधान (PM) देखील येणार आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखे वागले पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना कधी अशा प्रकारे प्रचार करतांना पाहिले आहे का? सरदार वल्लभभाई पटेल काय महाराष्ट्रात जागा वाटपासाठी चर्चेला येऊन बसायचे का? असा टोला यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली ‘ही’ तारीख

तसेच “देश वाऱ्यावर सोडून आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री (Home Minister) गल्लीबोळात प्रचार करत आहेत आणि म्हणे वन नेशन वन इलेक्शन करणार. त्यांना हे झेपणार आहे का? गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरत आहेत. पंतप्रधानांनी एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन केले आहे. एकच मेट्रो आहे, सहा वेळा काय नारळ फोडताय? अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. त्याबरोबरच राज्यात २४ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक आयोगाला नवीन विधानसभा प्रस्थापित करावी लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या