Sunday, October 18, 2026
HomeनगरSangamner : खा. पवार, थोरात व खा. लंके यांचा एकाच वाहनातून प्रवास;...

Sangamner : खा. पवार, थोरात व खा. लंके यांचा एकाच वाहनातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

राज्यातील राजकारणात अनेकदा राजकीय घडामोडींपेक्षा नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या हालचाली अधिक चर्चेचा विषय ठरतात. अशीच एक चर्चा बुधवार( दि.24) जून रोजी सकाळी संगमनेरमध्ये रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी एकाच गाडीमधून पुढील कार्यक्रमासाठी प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.

- Advertisement -

प्रवरानगर येथे आयोजित कार्यक्रमासाठी खासदार शरदचंद्र पवार पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गामार्गे प्रवास करत असताना सकाळच्या सुमारास संगमनेर येथे थांबले होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ संवादही झाला. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होताना बाळासाहेब थोरात हे खा. शरदचंद्र पवार यांच्या वाहनात सहभागी झाले.

या प्रवासादरम्यान वाहनात खा. निलेश लंके हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते एकाच गाडीमध्ये दिसल्याने उपस्थित कार्यकर्ते, नागरिक आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष या प्रसंगाकडे वेधले गेले. वाहनाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्यांचे स्वागत करून अनेकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, वाहनात बसण्यापूर्वी खासदार शरदचंद्र पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना आपल्या शेजारी बसण्याचा आग्रह केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यानंतर पवार, थोरात आणि लंके हे तिघेही एकाच कारमधून प्रवरानगरच्या दिशेने रवाना झाले. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांचा एकत्रित प्रवास चर्चेचा विषय ठरला. जरी हा प्रवास नियोजित कार्यक्रमासाठी असला तरी एकाच वाहनातून झालेला हा प्रवास आणि त्यावेळी दिसलेले सौहार्द यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले. घडलेल्या या प्रसंगाची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : भरधाव कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; पाच...

0
नांदुरी | वार्ताहर | Nanduri सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे वाहतूक नियोजन करत असताना भरधाव सियाज कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले...