Saturday, May 4, 2024
Homeजळगावशिंदे गटाच्या आमदारांचा खासदार पवारांसोबत प्रवास

शिंदे गटाच्या आमदारांचा खासदार पवारांसोबत प्रवास

जळगाव – प्रतिनिधी jalgaon

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे देखिल राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे निघाले असता त्यांनी खा.शरद पवार यांच्या सोबतच प्रवास केला. या प्रवासादरम्यान जिल्ह्यातील शेतीविषयक प्रश्नांविषयी चर्चा झाली. तसेच पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांबाबतही खा. पवार यांनी माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडून जाणून घेतली. शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांच्यासोबतचा प्रवास आणि संवाद हे जिल्ह्यातील अनेक राजकीय तज्ञांचे डोके खाजवणारा ठरला.

खासदार शरद पवार आज अमळनेरात : जिल्ह्यातील अमळनेर येथे उद्या दि.16 रोजी राष्ट्रवादीच्या ग्रंथालय विभागाचे एकदिवसीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमीत्ताने खा. शरद पवार हे आज सायंकाळी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने जळगाव दौर्‍यावर येत होते. मुंबई येथे राजधानी एक्सप्रेसला जळगावच्या दिशेने निघायला काही वेळ अवकाश होता. खा. शरद पवार यांचे वाहन पार्कींगमध्ये असतांना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे देखिल जळगावला येण्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानकावर आले. याठिकाणी त्यांची खा. शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. खा.पवार यांनी आ.चिमणराव पाटील यांना त्यांच्या गाडीत बसवून घेतले.

- Advertisement -

पीकपाण्यासह सुरेशदादा, ईश्वरबाबुजींची विचारपूस

खा.शरद पवार यांनी आमदार चिमणराव पाटील यांना जिल्ह्यातील पीकपाण्याची परीस्थिती कशी आहे? अशी विचारणा केली. तसेच कापसाच्या भावासंदर्भातही त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे आ.चिमणराव पाटील यांनी सांगितले. यासोबतच माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी खा.ईश्वरबाबुजी जैन यांच्याविषयी देखिल खा.पवार यांनी विचारपूस केल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. तब्बल अर्धा तास त्यांच्या गाडीत जुन्या राजकीय नेत्यांबाबत चर्चा झाली. त्यात स्व. प्रल्हादराव पाटील, स्व. मुरलीधर आण्णा पवार यांच्यासोबतचे किस्सेही चर्चेत रंगल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या