Tuesday, September 17, 2024
Homeनगरजनता खोट्या प्रचाराला फसणार नाही - खा. शिंदे

जनता खोट्या प्रचाराला फसणार नाही – खा. शिंदे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जनतेच्या हिताचे लोककल्याणकारी निर्णय घेत जनतेच्या दारात जाऊन योजनांची प्रभावी अंमल बजावणी केली. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात फक्त अडीच दिवस मंत्रालयात थांबण्याचा विक्रम करणार्‍या उध्दव ठाकरेंनी सरकारबद्दल कितीही खोटा प्रचार करण्याचा उद्योग केला तरी विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला फसणार नसल्याची टीका खा. श्रीकांत शिंदे यांनी केली .
शिवसेना संवाद दौर्‍यांच्या निमित्ताने खा. श्रीकांत शिंदे शिर्डी दोर्‍यावर आले होते. ते म्हणाले राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बील माफीचा निर्णय, सुसक्षीत बेरोजगारांना स्टायपेंड आदीं योजनांना प्रचंड प्रतिसाद जनतेकडून सरकारला मिळत असताना विरोधी महाविकास आघाडीचे नेते मात्र सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करित आहे.

विरोधकांनी मात्र खोटं बोल पण रेटून बोल असा प्रचार लोकसभा निवडणुकीत केला. त्याचा विधानसभा निवडणुकीत परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंद बघायला मिळाला. दोन महिन्यात महाराष्ट्रात महिलांच्या खात्यावर सव्वा कोटी रुपये जमा झाले असून पुढील महिन्यात दीडशे कोटी रुपये जमा होतील. या योजनेमुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. पक्षाच स्थिती मजबूत होण्यासाठी हा दौरा असून दोन वर्षात नागरिकांना सरकारकडून मोठ्या प्रमाणात विविध योजनेचा लाभ मिळाला आहे. काँग्रेस सत्तेवर असताना मध्यप्रदेश व कर्नाटकमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचे विटंबन करून मोडतोड केली. विशाळगडावर अतिक्रमण हटवताना छत्रपतींवरचे प्रेम कुठे होते असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला.

छत्रपतींचा पुतळा तुटने ही अत्यंत दुख:देणारी बाब आहे. दोषींवर कारवाई होईल. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय लागलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांना संधी मिळताच बेशुट आरोप करण्याच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. काम करणार्‍या महायुतीसरकार बरोबर जनता असल्याने विरोधक बिथरले असल्याचा टोला त्यांनी लगावला. या सरकारने दोन वर्षात शेतकर्‍यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी व नागरिकांसाठी चांगले काम केले आहे जनता त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभे राहील व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारी असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. शासनाची योजना प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत गेली पाहिजे यासाठी कार्यकर्ता व प्रशासन काम करीत आहे. शासन आपल्या दारी या योजनेतून एकाच वेळी हजारो नागरिकांना एकाच ठिकाणी लाभ मिळाला.

आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतील शिवसेना, भाजप आणी राष्ट्रवादी एकत्रित लढवणार असून जागा वाटपाचा निर्णय तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. मंत्री तानाजी सावंत काय बोलले यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात समन्वय उत्तम असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी माजी खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, नितीन औताडे, विजय जगताप तसेच राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोला, नेवासा तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या