Saturday, July 27, 2024
Homeक्राईमसराईत गुन्हेगार दाऊदवर पुन्हा एमपीडीए कारवाई ; ठाणे कारागृहात रवानगी

सराईत गुन्हेगार दाऊदवर पुन्हा एमपीडीए कारवाई ; ठाणे कारागृहात रवानगी

अमळनेर (Amalner) – प्रतिनिधी
एमपीडीए अंतर्गत नंदुरबार कारागृहातून ताब्यात घेऊन सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याच्यावर पुन्हा एमपीडीए कारवाई करून ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

शुभम देशमुखने एमपीडीए कारवाईत कारागृहातून सुटल्यांनतर लक्झरी चालक जयंत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी त्याचा शोध घेऊन धुळे येथील एका खानावळीतून ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

त्यांनतर त्याला नंदुरबार रवाना करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्याकडून प्रस्ताव तयार करून डीवायएसपी नंदवाळकर यांच्यामार्फत पुन्हा शुभम विरुद्ध एमपीडीए प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे, चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे यांनी शुभमला नंदुरबार कारागृहातून ताब्यात घेतले असून शुभमला ठाणे कारागृहत रवाना करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या