Saturday, July 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात दोन जणांवर एमपीडीएची कारवाई

जिल्ह्यात दोन जणांवर एमपीडीएची कारवाई

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

जिल्ह्यातील चोपडा येथील आणि भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील एक अशा दोन आरोपींवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात कुख्यात आरोपींवर एमपीडीए कारवाईचे सत्र सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार स्विकारल्यापासून वाळु माफिया, हिस्ट्रीशिटर अशा गुन्हेगारांची यादीच तयार केली आहे. त्यांचे गुन्ह्याचे स्वरूप बघून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जात आहे. चोपडा येथील सानेगुरूजी नगरातील आकाश संतोष भोई (वय 22) यांच्याविरूध्द सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यावर एमपीडीएची कारवाई करावी असा प्रस्ताव चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

जिल्हाधिकार्‍यांनी त्यास मंजूरी दिली असून आकाश संतोष भोई यास शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील इब्राहिम ऊर्फ टिपु ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (वय 29) याच्यावर देखिल भुसावळ, फैजपूर, शनिपेठ पोलीस ठाणे जळगाव, एमआयडीसी पोलीस ठाणे जळगाव अशा ठिकाणी सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलीस ठाणे पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी यांनी इब्राहीम याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे दिला होता. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजूरी दिल्याने इब्राहिम ऊर्फ टिपु ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (वय 29) याला स्थानबध्द करण्यात आले असून त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कारवाई सुरुच राहणार

जिल्हा प्रशासनातर्फे समाजासाठी धोकादायक असलेल्या व्यक्तींविरोधात एमपीडीए सारख्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आतापर्यंत 30 हून अधिक गुंडांवर अशा प्रकारची करण्यात आली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरु राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या