Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाMPL 2023 : एमपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाडला धावांचा पाऊस, ऋतुराज गायकवाडचं दमदार...

MPL 2023 : एमपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाडला धावांचा पाऊस, ऋतुराज गायकवाडचं दमदार अर्धशतक

पुणे | Pune

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्या पर्वातील पहिला सामना हा पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर करण्यात आलं होतं. या सलामीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पुणेरी बाप्पाने केदार जाधव कॅप्टन असलेल्या कोल्हापूर टस्कर्सवर ८ विकेट्स विजय मिळवला आहे.

- Advertisement -

या सामन्यात ऋतुराज गायकवाडची बट चांगलीच तळपली. गायकवाडने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि २७ चेंडूत ६४ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने एकूण ५ चौकार आणि ५ षटकार खेचले. ऋतुराजने या सामन्यात २३७.०४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. यासह ऋतुराज एमपीएलच्या या सीझनमध्ये प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणाारा पहिला खेळाडूू ठरला आहे.

Manipur Violence : मणिपूर धगधगतंच! केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं, सुरक्षारक्षक बघत राहिले, कारण…

चाहत्याची मैदानात एन्ट्री

ऋतुराज फलंदाजी करत असतानाच चाहत्याने सुरक्षा घेरा भेदत सामन्यात व्यत्यय आणला. चाहता मैदानात आला आणि ऋतुराजच्या पायाला स्पर्श केला आणि पुन्हा धूम ठोकली. यावेळी त्याने सुरक्षा रक्षकांना चांगलाच त्रास दिला. व्हिडिओत तो मैदानाच्या सीमारेषेवरून पळताना दिसत आहे.याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो डगआऊटच्या पाठीमागील स्टेडिअममधून थेट उडी मारून मैदानात एन्ट्री करतो. तसेच, ऋतुराजची भेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधतो आणि पुन्हा स्टेडिअममध्ये येतो.

मोठी कारवाई! जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात पाच दहशतवादी ठार

आज पहिल्यावहिल्या डबल हेडरचं आयोजन

स्पर्धेतील पहिल्यावहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा इगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला रात्री ८ वाजता सुरुवात होणार आहे. हे दोन्ही सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या