Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशMpox outbreak : आफ्रिकन देशांमध्ये 'मंकीपॉक्स'चा कहर… काय आहेत लक्षणे? कसा होतो...

Mpox outbreak : आफ्रिकन देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’चा कहर… काय आहेत लक्षणे? कसा होतो संसर्ग?

दिल्ली । Delhi

करोना महामारीने (COVID19) अवघ्या जगात कहर माजवला होता. ज्यामुळे संपूर्ण जगच थांबलं होतं. या आजारातून सुटका होते, तोच आता मंकीपॉक्स (monkeypox) आजाराने आफ्रिकन देशांमध्ये (African countries) कहर केला आहे.

- Advertisement -

केनिया, काँगो, युगांडा आणि रवांडा यासह सुमारे १३ आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ५२४ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स रोगाचा प्रसार जगासाठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या दोन वर्षात दुसऱ्यांदा हा आजार सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणजेच Public Health Emergency असल्याचं घोषित केलं आहे.

हे हि वाचा : स्वातंत्र्यदिनी पुणतांबा ग्रामस्थांचे ‘रेल्वे रोको’ आंदोलन! महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा अर्थ असा आहे की हा रोग संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित संशोधन, निधी, परस्पर सहकार्य आणि कठोर उपाययोजनांची गरज आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला, तर किंवा या विषाणूने दूषित झालेले मांस खाल्ले, तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

हे हि वाचा : Assembly Election 2024 : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात?

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसायला काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात.

पुरळ
ताप
थकवा
डोकेदुखी
थंडी जाणवणे
स्नायू दुखणे

याशिवाय, या आजारामध्ये सपाट, लाल ठिपके या स्वरूपात पुरळ उठणे देखील दिसू शकते, जे वेदनादायक असू शकते. हे पुरळ नंतर पू ने भरलेल्या फोडांमध्ये बदलतात. काही काळानंतर हे फोड खरुज बनतात आणि पडतात. या संपूर्ण प्रक्रियेला दोन ते चार आठवडे लागू शकतात. याशिवाय तुमच्या तोंडावर, चेहरा, हात, पाय, लिंग, योनी किंवा गुदद्वारावरही जखमा असू शकतात.

हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक

काय काळजी घ्यावी?

मंकीपॉक्स हा साथीचा आजार असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे. आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...