Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! तीन अधिकारी आणि क्लासचालकासह 6 जण अटकेत

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! तीन अधिकारी आणि क्लासचालकासह 6 जण अटकेत

मुंबई । Mumbai

प्रेमात लोक काय करतील याचा नेम नाही, पण प्रेयसीला थेट अधिकारी बनवण्यासाठी लोकसेवा आयोगाचा पेपरच फोडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ (Drug Inspector) परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर, आयोगाने ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. या फिल्मी वाटणाऱ्या मात्र गंभीर गुन्ह्यामुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, आता या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट-ब संवर्गातील पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या दिवसापासूनच गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर येत होत्या. विरोधक आणि परीक्षार्थींनी आक्रमक पवित्रा घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या सखोल तपास अहवालानंतर आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणामागे एक अजब ‘लव्ह स्टोरी’ कारणीभूत आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला स्पर्धा परीक्षेत पास करण्यासाठी MPSC मधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा पेपर फोडला. प्राथमिक निष्कर्षानुसार, हा लिक झालेला पेपर इतरत्र पसरला नसून केवळ त्याच एका महिला उमेदवारापर्यंत पोहोचला होता. मात्र, परीक्षेची सुचिता, गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी आयोगाने कठोर निर्णय घेत संपूर्ण परीक्षाच रद्द केली. एकाच्या गुन्ह्याची शिक्षा आता हजारो कष्टकरी विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे.

या हायप्रोफाईल रॅकेटचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ६ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये पेपर लिक करण्यासाठी मदत करणारे MPSC चे ३ कर्मचारी, मुख्य सूत्रधार (प्रियकर), एक क्लासचालक आणि संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकाचा समावेश आहे. सर्व आरोपींना सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे का, तसेच यात आयोगातील आणखी काही वरिष्ठ अधिकारी किंवा रॅकेट सहभागी आहे का, यादृष्टीने पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणीवर भर द्यावा – मुख्य...

0
नाशिक | Nashik विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. आता एसआयआरच्या पुढील टप्प्यात प्रारुप मतदार...