Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; सरकारने घेतला मोठा निर्णय

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे | Pune

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा (MPSC Exam) नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी MPSC च्या विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत होते.

यावर शिंदे-फडणवीस सराकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. (MPSC New Syllabus 2025)

UPSC प्रमाणे आता MPSC ला देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. मात्र, हा पॅटर्न २०२३ नव्हे तर २०२५ पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारतर्फे सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयाची घोषणा करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून आंदोलन ठिकाणी जल्लोष (Pune MPSC Students Celebration) साजरा केला. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांनी फडणवीस आणि शिंदे सरकारचे आभार मानले आहेत, असं म्हटलं. पडळकर हे विद्यार्थ्यांबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या