जळगाव jalgaon। प्रतिनिधी
कोविडच्या (Kovid) संकटातही महावितरणने (MSEDCL) नागरिकांसह सर्व रुग्णालय व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा (Power supply) केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणार्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही (Hospitals) समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली होती. मात्र या रुग्णालयाकडे महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी (Arrears) असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरण वारंवार पाठपुरावा करत असू देखील रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.
कोविड काळात महावितरणकडून जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना अखंडपणे विद्युतपुरवठा करण्यात आला होता. परंतु या कोविड केअर सेंटरकडून महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी भरलेली नाही. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीज जोडण्यांची 1 कोटी 66 लाख 42 हजार 640 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 75 हजार 848 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तसेच गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल 4 कोटी 66 लाख 36 हजार 223 रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
थकबाकी बाबत महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी शाकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक, व गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना पत्राद्वारे थकीत वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन के होत. तसेच थकबाकी भरण्यासंदर्भात त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
थकबाकी भर अन्यथा होणार कारवाई
महावितरणकडून थकबाकीदारांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आपणाकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. कोविड-19 आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिला आहे. तसेच थकबाकी संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले आहे.