Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी सेवेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

एसटी सेवेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई / Mumbai

- Advertisement -

शनिवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पावणेदाेन महिन्यांचे वेतन

राज्य सरकारने राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस (ST Bus) आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु होणार आहे. यासाठी ई पासची आवश्यकता नाही. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.करोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. गणेशोत्सवासाठी एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या