Thursday, May 30, 2024
Homeजळगावकामगार राज्य नाट्य स्पर्धेत ‘मडवॉक’ प्रथम

कामगार राज्य नाट्य स्पर्धेत ‘मडवॉक’ प्रथम

जळगाव । jalgaon

नाशिक येथील संचालक कामगार केंद्र, नाशिक विभागातर्फे कामगार राज्य नाट्य स्पर्धा (Labor State Drama Competition) 29 डिसेंंबर ते 23 जानेवारीदरम्यान घेण्यात आली. यावेळी पाचोरा केंद्राचे श्रीपाद देशपांडे लिखित मडवॉक (‘Mudwalk’) हे नाटक वैयक्तिक पाच बक्षिसांसह प्रथम आल्याने सर्व स्तरातून या नाटकातील कलाकारांचे कौतुक करण्यात येत आहे.

- Advertisement -

नाशिक येथे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात एकूण 23 नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पाचोरा केंद्राकडून मडवॉक हे नाटक सादर करण्यात आले. यावेळी या नाटकाने रसिक प्रेक्षकांसह परिक्षकही भारावले. दरम्यान, या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मुळात बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित असणार्‍या या नाटकाचे दिग्दर्शन दिनेश माळी यांनी केले असून या नाटकात एकूण 20 कलाकारांचा सहभाग होता.

यात दिग्दर्शन प्रथम दिनेश माळी, पुरुष अभिनय द्वितीय वैभव मावळे, पार्श्वसंगीत द्वितीय दीपक महाजन, नेपथ्य तृतीय प्रज्ञा बिर्‍हाडेे तर प्रकाश योजना तृतीय अभिषेक कासार यांना पारितोषिके मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या