Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशमुकेश अंबानींना धमकीचे पाच मेल; ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, मुंबई पोलिसांकडून आरोपीला...

मुकेश अंबानींना धमकीचे पाच मेल; ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक

मुंबई | Mumbai

गेल्या सात दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मेलवरुन चारवेळा जीवे मारण्याची धमकी आली होती. या प्रकरणी आता मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेलंगणातून एका आरोपीला अटक केली आहे, या आरोपीचे नाव गणेश रमेश वानपारधी (१९) असे आहे.गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

न्यायालयाने गणेशला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आठवड्याभरात अंबानी यांच्या कार्यालयीन मेलवर पाच ईमेल आले. आधी २० कोटी नंतर २०० कोटी आणि मेलला प्रतिसाद देत नाही म्हणून ४०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

पाकिस्तानच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला; अनेक जेट्स जाळले, व्हिडिओ व्हायरल

काल आलेल्या मेलनंतर पोलिसांनी दिलेली माहिती अशी होती, धमकीचा मेल आला होता तो बेल्जियममधील एका सर्व्हरवरून एकाच ईमेल आयडीवरून दोन ईमेल आले होते. याआधीही मुकेश अंबानी यांना एकाच ईमेल आयडीवरून आणि शादाब खानकडून तीन धमकीचे मेल आले होते.

२७ ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल अकाऊंटवर एक मेल आला होता. तो ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पहिल्यांदा आरोपीने २० कोटी तर दुसऱ्यांदा २०० कोटीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीने तिसरा ईमेल करत ४०० कोटी रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या