Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याMukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, २० कोटींची...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, २० कोटींची मागणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर जीवे मारू असं धमकी देणाऱ्यानं म्हटलं आहे. मुकेश अंबानींना ईमेलमार्फत धमकी आल्याची माहिती मिळत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीनं मुकेश अंबानींच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. धमकीच्या ई-मेलमध्ये मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत.” मुकेश अंबानींच्या ईमेलवर आलेला मेल पूर्णपणे इंग्रजीत होता.

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या