Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याRIL AGM 2023 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा! रिलायन्स समूहाची जबाबदारी नव्या...

RIL AGM 2023 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा! रिलायन्स समूहाची जबाबदारी नव्या पिढीकडे; नीता अंबानींचा राजीनामा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला असून आता त्यांच्या जागी ईशा अंबानींची (Isha Ambani) नियुक्ती करण्यात आली आहे….

Chandrashekhar Bawankule: “…तर ईट का जवाब पत्थर से देऊ”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानींची संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. त्यामुळे नीता अंबानी आता बोर्डातून पायउतार झाल्या असून त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) अध्यक्षपदी राहणार आहेत. तसेच या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत संबोधित करतांना मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा उल्लेख केला.

ठरलं! गणेश चतुर्थीला Jio AirFibre लॉन्च होणार, मुकेश अंबानींची घोषणा

यावेळी अंबानी म्हणाले की, हा न्यू इंडिया असून नवा भारत (India) थांबत नाही आणि थकत नाही. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, आज देश जुन्या विचारसरणीला मागे टाकून नवीन ध्येये साध्य करत आहे. हा नवा भारत आहे, जो थांबत नाही, खचून जात नाही, दम देत नाही आणि हार मानत नाही. त्यामुळे भारत वेगाने आर्थिक प्रगती करत असून २०४७ पर्यंत भारत पूर्णपणे विकसित देश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा होणार सुरु

पुढे बोलतांना अंबानी म्हणाले की, डिसेंबरपासून ग्राहकांना देशातील प्रत्येक भागात ५ जी सेवा मिळण्यास सुरुवात होईल. जिओने २ जी फीचर फोन पेक्षा कमी किंमतीत फक्त ९९९ रुपयांमध्ये जिओ भारत फोन लॉन्च करून भारतातील प्रत्येक घरात मोबाईल आणि ४ जी पुरवण्याचे काम केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Neeraj Chopra : “मी स्वत:ला…”; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

गणेश चतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ होणार लाँच

जिओच्या एअर फायबरची (Jio Air Fiber) प्रतीक्षा आता संपली असून गणेश चतुर्थी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी जिओ एअर फायबर लाँच होणार आहे. जिओ एअर फायबर, ५ जी नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान केली जाईल. जिओ एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मुकेश अंबानी यांनी समूह २०२६ पर्यंत बॅटरी गिगाफॅक्टरी स्थापन करणार असून ही सुविधा गुजरातमधील जामनगरमध्ये उभारण्यात येणार आहे.

Sanjay Raut : ‘इंडिया आघाडी’चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

- Advertisment -

ताज्या बातम्या