Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशदेशातील श्रीमंतांची यादी जाहीर! अंबानी, अदानी कितव्या नंबरला? संपत्ती वाचून व्हाल हैराण

देशातील श्रीमंतांची यादी जाहीर! अंबानी, अदानी कितव्या नंबरला? संपत्ती वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली | New Delhi

भारतात यावर्षी २०२३ मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Indian Of India) कोण याचा खुलासा झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ (Hurun India Rich List 2023) जाहीर केली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukhesh Ambani) यांनी बाजी मारली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) या यादीत पहिल्या क्रमांकावर होते मात्र, यंदा अंबानी त्यांच्या पुढे गेले.

- Advertisement -

हुरुन इंडिया आणि ३६० वन वेल्थने आज ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ जारी केली जी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची १२ वी वार्षिक रँकिंग आहे. या यादीत गौतम अदानी यांची संपत्ती मुकेश अंबानींच्या तुलनेत खूपच कमी नोंदवली गेली.

पठाणकोट हल्ल्याच्या सुत्रधाराची पाकिस्तानमध्ये हत्या; अज्ञातांनी सियालकोटमध्ये गोळ्या घालून केले ठार

रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती १,६५,१०० कोटी रुपये होती. आता ती ८,०८,७०० कोटी रुपये झाली आहे. त्यात चार पट वाढ झाली आहे. भारतातील श्रीमंतांच्या संख्यात जवळपास ३८ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या खळबळजनक अहवालामुळे अदानींच्या निव्वळ संपत्तीत लक्षणीय घट झाली.

अदानींच्या संपत्तीत घट

जानेवारी २०२३ मध्ये शॉर्ट शेलिंग कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी यांना मोठे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये गेल्या वेळी अव्वल स्थानावर असलेले अदानी यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती पाहता यंदा त्या संपत्ती ५७ टक्के घट झाली आहे. यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये अदानींची संपत्ती ४,७४,८०० कोटी एवढी आहे.

अफगाणिस्तान पुन्हा हादरले; ६.१ रिश्टर स्केलची तिव्रता, चार दिवसात चौथा भूकंप

हुरुन इंडिया श्रीमंतांची यादी २०२३

1) मुकेश अंबानी- ८०८,७०० कोटी रुपये

2) गौतम अडानी- ४७४,८०० कोटी रुपये

3) सायरस एस पूनावाला- २,७८,५०० कोटी रुपये

4) शिव नाडर- २,२८,९०० कोटी रुपये

5) गोपीचंद हिंदुजा- १,७६,५०० कोटी रुपये

6) दिलीप सांघवी – १,६४,३०० कोटी रुपये

7) एलएन मित्तल – १,६२,३०० कोटी रुपये

8) राधाकिशन दमानी- १,४३,९०० कोटी रुपये

9) कुमार मंगलम बिर्ला- १,२५,६०० कोटी रुपये

10) नीरज बजाज- १,२०,७०० कोटी रुपये

Mahadev Online Gaming App: संजय दत्त, सुनिल शेट्टी, रश्मिका मंदाना सोबत ३४ कलाकार ईडीच्या रडारवर

सन फार्माचे दिलीप सांघवी हे १,६४,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. स्टील किंग लक्ष्मी मित्तल १,६२,३०० कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह सातव्या तर D-Mart चे राधाकिशन दमानी हे १,४३,९०० कोटी संपत्तीसह यादीतील आठव्या क्रमांकावर आहेत.

३६० वनचे सह-संस्थापक आणि ३६० वन वेल्थचे संयुक्त सीईओ यतीन शाह म्हणाले की आता १,३१९ व्यक्तींकडे १,००० कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता असून ह्यात गेल्या पाच वर्षांत ७६% वाढ झाली आणि लोकांची संपत्ती १०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या