मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता महिलांना (Women) कधी मिळणार, याकडे संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी बोलतांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
- Advertisement -
मंत्री तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचा महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे. येत्या ८ मार्चला म्हणजेच महिलादिनी (Women’s Day) लाडकी बहीण योजनेचा एकत्रित ३००० हजार रुपये मिळणार आहेत”, असे त्यांनी म्हटले.