Monday, September 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात 'या' तारखेला जमा होणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे

मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारने आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये जमा केले आहेत. त्यानंतर या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांना (Women) पडला होता. यासंदर्भात आता स्वत: महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

हे देखील वाचा : Laxman Hake : “मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला राजे म्हणणार नाही”; लक्ष्मण हाकेंची टीका

आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. तसेच अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण २ कोटी महिलांना लाभ दिला जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

दरम्यान, याआधी जुलै महिन्यात पहिला हप्ता आणि ऑगस्ट महिन्यात दुसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजेनसाठी (Yojana) अर्ज केला त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात एकदम दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच ३ हजार रुपये जमा करण्यात आले.सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात रक्षबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता.

हे देखील वाचा : …तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीतील नेत्याचा निर्वाणीचा इशारा

महिलांना ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या योजेनसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम तीन हप्त्याचे पैसे म्हणजेच ४ हजार ५०० रुपये जमा होऊ शकतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -

ताज्या बातम्या