Saturday, September 21, 2024
Homeनगरमुख्यमंत्री वयोश्रीमध्ये 1 लाख 32 हजार, तर तीर्थक्षेत्र दर्शनमध्ये 2 हजार 806...

मुख्यमंत्री वयोश्रीमध्ये 1 लाख 32 हजार, तर तीर्थक्षेत्र दर्शनमध्ये 2 हजार 806 अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांचा ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यासाठी 6 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात वयोश्री योजनेत 1 लाख 32 हजार 342, तर तीर्थदर्शन योजनेत 2 हजार 806 लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी केले. या दोनही योजनांसाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, क्षेत्रफळाने व लोकसंख्येच्यादृष्टीने नगर जिल्हा मोठा आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी मोठा वाव आहे. या दोनही योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 6 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेचा शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालयामध्ये योजना कक्ष सुरु करण्यात यावा. या कक्षातुन लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्याबरोबरच त्यांचे लाभासाठीचे फॉर्म भरुन घेण्यात यावेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर म्हणाले, जिल्ह्यात दोन दिवसीय शिबीरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे चांगले काम झाले आहे. परंतू एवढ्यावर समाधानी न राहता जिल्हा या योजनांच्या अंमबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहील यादृष्टीने काम करा. सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या