Tuesday, March 25, 2025
Homeनगरजिल्ह्यातील साडेपाच हजार उमेदवारांना फायदा

जिल्ह्यातील साडेपाच हजार उमेदवारांना फायदा

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना आणखी पाच महिने प्रशिक्षण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील युवकांना एकूण 11 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेता येईल. नगर जिल्ह्यात साडेपाच हजार प्रशिक्षणार्थी सध्या विविध शासकीय विभाग आणि खासगी आस्थापनेत कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार आता ज्यांचे सहा महिन्यांचे कार्य प्रशिक्षण पूर्ण झालेय त्यांना आणखी 5 महिने प्रशिक्षण घेता येणार आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल. तसेच, ज्या उमेदवारांचा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल.

- Advertisement -

उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय राहणार आहे. आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच, अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी निर्णय घ्यावा, असे नवीन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात महसूल 933, पोलिस 45, जिल्हा परिषद 2 हजार 946 (विविध विभाग), महानगरपालिका 110, जिल्हा रुग्णालय 30, महावितरण 14, परिवहन महामंडळ 28, इतर शासकीय विभाग 173 आणि खासगी 1 हजार 401 अशा प्रशिक्षणार्थी यांना सहा महिन्यांपूर्वी नेमणुकीचे आदेश देण्यात आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...