Wednesday, April 30, 2025
Homeनगरहमीपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्रावर ठरणार सरकारी ‘तीर्थदर्शन’

हमीपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्रावर ठरणार सरकारी ‘तीर्थदर्शन’

जिल्ह्यासाठी एक हजारांचा कोटा || ऑफलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली असून त्यासाठी अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, या योजनेत पात्र ठरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनसाठी विविध हमीपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र यासह नातेवाईकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आलेल आहे. हे विविध प्रमाणपत्र सादर करणार्‍यांची योजनेत निवड करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला या योजनेसाठी एक हजारांचे टार्गेट दिलेेले आहे. यामुळे योजनेत यंदा 1 हजार ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सहभाग घेता येणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने 11 जुलैच्या बैठकीत राज्यातील ज्येष्ठांना राज्यभरासह देशातील विविध धार्मिक ठिकाणी दर्शनाला पाठवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीच्या शासन निर्णयात 14 जुलैरोजी बदल करण्यात आला. त्यानूसार आता योजनेत 31 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करणार्‍यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासह योजनेसाठी राज्यातील प्रत्येेक जिल्ह्यासाठी 1 हजारांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. यानूसार नगर जिल्ह्यातून एक हजार व्यक्तींना योजनेत देवदर्शनासाठी जाता येणार आहे. त्यावर सरकारच्यावतीने प्रत्येकी 30 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेत सहभागी होणार्‍या 75 वर्षाच्या ज्येष्ठसोबत जीवनसाथ किंवा सहायक यांचे 60 वर्षापेक्षा कमी असल्यास त्यांना तीर्थदर्शनासाठी प्रवास करता येणार आहे. जादा येणार्‍या अर्जामधून लॉटरी पध्दतीने योजनेसाठी लाभार्थी यांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेसाठी अर्जदाराच्या अर्जात स्वत: सोबत जवळच्या नातेवाईकांची माहिती, स्व उत्पन्नाची माहिती, शासकीय सक्षमेसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे स्वत:चे हमीपत्र, जवळच्या नातेवाईकाचे प्रमाणपत्र, जीवनसाथी अथवा सहायकाचे हमीपत्र आदी सादर करावे लागणार आहेत. हे हमीपत्र, प्रमाणपत्र देवून न शकणार्‍यांचे सरकारी देवदर्शन मात्र मुकणार आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवरील विविध शासकीय योजनांचा वाढता बोजा पाहता, गाजावाजा करून घोषणा केलेल्या तीर्थदर्शन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक हजारांचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. यामुळे या योजनेत राज्यातून अवघे 36 हजार लाभार्थी यांना देशभर तीर्थदर्शन करता येणार आहे. नगरसह सारख्या 50 लाख लोकसंख्या असणार्‍या आणि 14 तालुके असणार्‍या जिल्ह्यात कोणाकोणाचा सरकारी तीर्थदर्शनासाठी नंबर लागणार हे देवालाच माहीत असणार अशी स्थिती आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये! पहलगामच्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत घेतला मोठा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात तिन्ही दलांचे...