Saturday, May 4, 2024
Homeनगरमुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन संपन्न

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन संपन्न

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील सोनई (Sonai) येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने (Mula co-operative sugar factory) मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख (Minister of Soil and Water Conservation Na Shankarrao Gadakh) यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन (Inauguration of distillery and ethanol project) शुक्रवार दि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:55 वाजता राज्याचे पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे (Tourism, Environment Minister Aditya Thackeray) यांच्या हस्ते संपन्न झाले.

- Advertisement -

मुळा उद्योग समुहाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख ,खा. सदाशिवराव लोखंडे, सुनीलभाऊ गडाख, युवा नेते उदयनराजे गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले,कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर आदी यावेळी उपस्थित होते.

दुपारी 4:50 वाजता ना.ठाकरे यांचे मुळा कारखाना कार्यस्थळावर आगमन झाले. 4:55 वाजता इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन झाले. उदघाटनानंतर ना.आदित्य ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाले. उपस्थितांनी घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यक्रम व सभेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या