Tuesday, October 27, 2026
HomeनगरAhilyanagar : मुळातून बंधारे आणि शेतीसाठी प्रत्येकी एक आवर्तन

Ahilyanagar : मुळातून बंधारे आणि शेतीसाठी प्रत्येकी एक आवर्तन

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, टंचाईच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुळा उजवा कालव्यातून बंधार्‍यांना, पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एक आवर्तन तसेच मुळा डावा कालव्यातून जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. त्यातील एक शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुळा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे सूक्ष्म नियोजन करावे. पाणी वितरणात कार्यक्षमता वाढवून पाण्याचा अपव्यय टाळण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री विखे बोलत होते.

- Advertisement -

बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, विठ्ठल लंघे, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पातील पाणीवापराचे नियोजन, कालव्यांव्दारे पाणी वितरण आणि उपलब्ध जलसाठ्याच्या कार्यक्षम वापराबाबत चर्चा करण्यात आली. रब्बी हंगामात पाण्याची गरज लक्षात घेऊन वितरणाचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

पाण्याचे महत्त्व लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द पध्दतीने काम करावे. पाणी वितरणाच्या प्रक्रियेत विविध विभागांमध्ये समन्वय राखून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त योग्य उपयोग होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

रब्बी हंगामासाठीपाणी नियोजन
बैठकीत अधीक्षक अभियंता शेटे आणि कार्यकारी अभियंता पाटील यांनी सादरीकरणाव्दारे मुळा प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र, लाभक्षेत्रातील पर्जन्यमान, सन 2026-27 मधील खरीप हंगामातील पाणीवापर आणि आगामी पाणी नियोजनाची सविस्तर माहिती दिली. मुळा उजवा कालव्यातून बंधार्‍यांना, पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत एक आवर्तन तसेच मुळा डावा कालव्यातून जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. त्यातील एक शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

Akole : भंडारदरा उच्चस्तरीय कालव्याचे आवर्तन सुरु होण्याची आशा

0
अकोले |प्रतिनिधी| Akole भंडारदरा धरणातून रविवारी सकाळी 11-30 वाजता वीज निर्मिती केंद्रातून 815 क्युसेक्सने नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग सोडतेवेळी धरणात 10...