Saturday, April 26, 2025
Homeनगरमुळा डॅम फाट्याजवळ चारचाकी अडवून लुटणारी टोळी शिर्डी येथे मुद्देमालासह गजाआड

मुळा डॅम फाट्याजवळ चारचाकी अडवून लुटणारी टोळी शिर्डी येथे मुद्देमालासह गजाआड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड राज्य महामार्गावर 12 जून रोजी रात्रीच्या दरम्यान चारचाकी वाहनात आलेल्या चौघा चोरट्यांनी चारचाकी वाहन अडवून मारहाण करून साडेनऊ लाख रूपयांच्या रोख रक्कम व तीन तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याच्या घटना दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास लावला. शिर्डी येथील सावळीविहीर फाटा येथे सापळा लावून आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील अनिल रामचंद्र घाडगे व त्यांचा चालक 12 जून रोजी चारचाकीमधून नगरहून राहुरीकडे येत असताना मुळा डॅम फाट्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर अज्ञात चालकाने चारचाकी आडवी लावून अनोळखी चार इसमांनी हातातील कत्तीने गाडीची काच फोडुन अनिल घाडगे यांचा वाहन चालक सुरेश दामोधर शेटे, गडधे आखाडा, ता. राहुरी. यास शस्त्राचा धाक दाखवून खाली उतरवून मागे बसवले. नंतर ते चारही चोरटे घाडगे यांच्या गाडीत बसले. त्यांनी अनिल घाडगे व त्याच्या वाहन चालकाच्या डोळयावर पट्टी बांधून गाडी वांबोरीच्या दिशेने नेली. त्यावेळी चोरट्यांनी अनिल घाडगे यांच्या जवळील साडेनऊ लाख रूपये रोख रक्कम, दोन तोळ्याची चैन व एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 10 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.

सदर घटनेबाबत दिलेल्या तक्रारी वरुन राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 394, 364 (अ), 323, 341, 504, 506, 34 प्रमाणे अपरहरणासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणे करीता पथक नेमून समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, हवालदार मनोज गोसावी, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष खैरे, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ. आकाश काळे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, चालक हवालदार उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमले.

16 जून रोजी पोलीस निरीक्षक श्री. आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, राहुरी येथील चारचाकीतील इसमांना लुटणारे आरोपी योगश खरात रा. कोपरगाव व त्याचे साथीदार असुन ते सावळीविहीर फाटा, शिर्डी, ता. राहाता येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकास कळवून कारवाई बाबत आदेश दिले.

पथक सापळा लावुन थांबलेले असताना सहा इसम संशयीत हालचाली करताना दिसून आले. पथकाची खात्री होताच अचानक त्यांचेवर छापा घालताच त्यातील दोन इसम गर्दीचा फायदा घेवुन पळून गेले व उरलेले चार इसम हे देखील पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांची नावे योगेश कैलास खरात (वय 24) रा. भोजडे चौक ता. कोपरगाव, अनिल आण्णासाहेब मालदोडे (वय 30), रा. पिंपळवाडी ता. राहाता, गुड्डू ऊर्फ सागर विठ्ठल मगर (वय 21), रा. हनुमानवाडी कान्हेगाव, ता. कोपरगाव व सोनू ऊर्फ सोन्या सुधाकर पवार (वय 25), रा. हॉलीडे पार्क शेजारी, शिर्डी असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवून पळून गेलेल्या इसमांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे धनंजय प्रकाश काळे रा. रामवाडी, संवत्सर ता. कोपरगाव व मयुर अनिल गायकवाड रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव (फरार) असे सांगितले. ताब्यातील चार आरोपींकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाचे विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हा करणे करीता त्यांना किरण बबन कोळपे रा. विळद, जि. अहमदनगर, आकाश पांडुरंग शिंदे रा. पाण्याचे टाकीजवळ, विळद, ता. जि. अहमदनगर, महेश विठ्ठल वाघ व सोनु ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे, दोन्ही रा. खांडके ता. जि. अहमदनगर यांनी मदत केली असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर आरोपींना सोबत घेवून आरोपींचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात जबरीने चोरी केलेल्या मालमत्तेपैकी 2 लाख 1 हजार रुपये रोख रक्कम, 1 लाख 20 रूपये किंमतीची सोन्याची चैन, गुन्हा करणेसाठी वापरलेले 7 लाख रुपये किंमतीची चारचाकी वाहन, 100 रुपये किमंतीचा एक रामपुरी चाकू व आरोपींचे ताब्यातील 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 36 हजार 100 रुपये किंमतींचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींना ताब्यात घेवून राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले. पुढील कारवाई राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.

यातील आरोपी सोन्या सुधाकर पवार रा. साकुरी हा शिर्डी जानेवारी 2023 मध्ये दाखल भादविक 302 व राहाता मागील वर्षी दाखल भादविक 379 या दोन गुन्ह्यात फरार आहे. तसेच पळुन गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.आरोपी योगेश कैलास खरात हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी आर्म ऍक़्ट व सरकारी कामात अडथळा असे गंभीर स्वरुपाचे एकुण 8 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी धनंजय प्रकाश काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा, दरोडा तयारी, आर्म ऍक़्ट असे गंभीर स्वरुपाचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश पांडुरंग शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, आर्म अ‍ॅक़्ट असे गंभीर स्वरुपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, व उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...