Wednesday, February 4, 2026
HomeनगरRahuri : मुळाचा साठा आज 24000 दलघफू

Rahuri : मुळाचा साठा आज 24000 दलघफू

राहुरी, कोतुळ |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीला छोटा पूर आला आहे. या पुराचे पाणी कोतुळ येथील मुळानदी काठावरील कोतुळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.

- Advertisement -

दरम्यान, धरणात पाण्याची आवक वाढल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल रात्री 23400 दशलक्ष घनफुटापेक्षा जास्त साठा झाला होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास हे धरणही लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई व अन्य भागात जोरदार पाऊस होत असल्याने सकाळी मुळा नदी पात्रतून मुळा धरणाकडे 20428क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी 12 वाजता 23076 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. तर सायंकाळी 6 वाजता 22473 क्युसेक विसर्ग सुरु होता कोतुळ येथे काल सकाळी 37 मिमी पावसाची नोंद झाली.

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने धरणात आवक खुपच मंदावली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, आंबीत पाचनई, कोथळा, कोहने, कोतुळ या भागात सोमवार पासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. काल पावसाचा जोर वाढल्याने आज धरणात विक्रमी पाण्याची आवक होणार असून पाणीसाठा 24000 दलघफूवर जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...