Friday, December 13, 2024
Homeनगरमुळा उजव्या कालव्याच्या 174 पाणी वापर संस्थांसाठी 20 ऑगस्टला मतदान

मुळा उजव्या कालव्याच्या 174 पाणी वापर संस्थांसाठी 20 ऑगस्टला मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुळा पाटबंधारे विभागाच्या उजव्या कालाव्यातंर्गत येणार्‍या 174 पाणी वापर संस्थांची दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या पाणी वापर संस्थांच्या निवडणुकीसाठी गुरूवार (दि.20) पासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

- Advertisement -

मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणार्‍या मुळा उजवा कालव्यातंर्गत राहुरी, नेवासा आणि शेवगाव तालुक्यातील उपविभागातंर्गत मोडणार्‍या राहुरी, घोडेगाव, नेवासा, चिलेखनवाडी आणि अमरापूर विभागातील 174 पाणी वापर संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात राहुरी विभागातील 34, घोडेगाव विभागातील 16, नेवासा विभागातील 42, चिलेखनवाडी विभागातील 43 आणि अमरापूर विभागातील 39 अशा 174 पाणी वापर संस्थांचा समावेश आहे.

या संस्थांच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि.20) पासून इच्छुकांना निवडणूक अर्ज दाखल करणे, दाखल अर्जाची 28 ते 31 जुलै दरम्यान छाननी, 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान माघार, 3 ऑगस्टला निवडणूक रिंगणातील उमदेवार यांना चिन्हांचे वाटप आणि त्यानंतर 20 ऑगस्टला मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीत संबंधित पाणी वापर संस्थेचा सभासद थकबाकीदार असल्यास अथवा संबंधित पाणी वापर संसथेचा विद्यमान संचालक अथवा पदाधिकारी थकबाकीदार असल्यास त्यांना महाराष्ट्र सिंचन पध्दतीने शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 नूसार निवडणूक लढवण्यास बंदी राहणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या